करुणा मुंडे - मी माझ्या पतीच्या पैशातूनच समाजसेवा करत असते

 


न्यायमंत्री धनंजय मुंडे हे माझे पती आहेत आणि ही वस्तुस्थिती संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यांनी स्वतः याची कबुली दिली आहे.ज्या पद्धतीने इतरांच्या बायका त्यांच्या नवऱ्याचा पैसा खर्च करतात तसा मी सुद्धा करत असते. मी माझ्या पतीच्या पैशातूनच समाजसेवा करत असते हे जगजाहीर आहे असे सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.

मी नेमकी कितवी पत्नी करुणा मुंडे केला मोठा खुलासा वाचा सविस्तर

न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी नुकताच फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, माझे पती जे मला पैसे देत त्यातून वाचवून ठेवलेल्या पैशातून मी आज समाजसेवा करत आहे. मला महागडे दागिने किंवा महागतील साड्यांची नव्हे तर समाजसेवेची आवड आहे. मी किंवा माझे पती जे काही करत आहोत ते जनतेचेच पैसे आहेत त्यामुळे मी जे काही काम करत आहे त्यात कोणतीही मोठी गोष्ट नाही. मला वहिनी साहेब लोकं म्हणतात हीच माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे.

यावेळी त्यांना ट्रोल करणाऱ्यांचा समाचार घेतला.करुणा मुंडे ही धनंजय मुंडे यांची कितवी पत्नी आहे हे विचारणाऱ्या लोकांना त्यांनी आवाहन केले की माझ्यावर कोर्टाचे असणारे निर्बंध हटवण्यास मुंडे यांना सांगा. न्यायालयातून माझे तोंड बंद करण्यात आले आहे. मी नेमकी कितवी पत्नी आहे हे सत्य लोकांसमोर येवू नये म्हणून माझ्यावर बंधने आणली गेली आहेत असे त्या म्हणाल्या.