अनलॉक ! जाणून घ्या तुमचा जिल्हा अनलॉकच्या कोणत्या टप्प्यात

 



राज्यातील स्तरनिहाय अनलॉक बाबतचा आदेश शनिवारी मध्यरात्री अखेर जारी करण्यात आला आहे. 

कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता या दोन आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. 

07 जूनपासून हि अधिसूचना लागू होणार असून टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र अनलॉक केला जाणार आहे. 

त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. जाणून घेऊयता आपल्या जिल्ह्याची स्थिती काय?

● पहिला टप्पा  (18 जिल्हे): औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे , वर्धा, वाशिम, यवतमाळ

● दुसरा टप्पा (5 जिल्हे): अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार,

● तिसरा टप्पा (10 जिल्हे): अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर

● चौथा टप्पा (2 जिल्हे): पुणे, रायगड

● पाचवा टप्पा : सध्या पाचव्या टप्प्यात एकही जिल्हा नाही. जर पुढील आठवड्यात जास्त रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या टप्प्यामध्ये समावेश होईल.

पॉझिटिव्हिटी रेट नुसार लेव्हल 

● पहिली लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के, तर ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी असावी 

● दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान असावी 

● तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के तर ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त असावी

● चौथी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के तर ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर असावी 

● पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर व ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त असावे