परळीत माथेफिरूंनी चारचाकी गाड्यांची केली नासधूस पोलिसांचे गुंडांना अभय



परळी शहरातील तुळजाईनगर, कृष्णानगर, गणेशपार नगर भागात नागरिकांनी आपल्या दारासमोर लावलेल्या चारचाकी गाडीचे अज्ञात माथेफिरूंनी काचा फोडून मोठे नुकसान केले. 

सात ते आठ गाड्यांच्या काचा या माथेफिरूंनी फोडल्या आहेत. त्णयांना नासधूस करताना रोखणार्‍या नागरिकांनाही त्यांनी रॉडने आणि दगडाने मारहाण केल्याचे समजते. 

या भागात पोलीस पेट्रोलिंग करत नसल्यानेच गुंडागर्दी वाढली असून अशा गुंडांना पोलीस अभय देत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया नागरिकातून उमटत आहेत.

परळी शहरातील तुळजाईनगर, कृष्णानगर, गणेशपार नगर भागात नागरिकांनी आता आपल्या चारचाकी रस्त्याच्या कडेला लावल्या असता दुचाकीवर आलेल्या अज्ञात माथेफिरूंनी रॉड आणि दगडाने चारचाकी वाहने फोडल्या. 

यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. काचा फोडताना नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही रॉड आणि दगडाने मारहाण केल्याचे समजते. 

या भागात पोलीस पेट्रोलिंग करत नसल्यानेच असे प्रकार होत असून गुंडांना पोलीस अभय देतात, असा तीव्र संताप नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.