🤓 'या' क्षेत्रातील नोकऱ्यांना मागणी वाढणार!


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या Lockdown मुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. त्यामुळे जगासमोर सध्या बेरोजगारीचे मोठे संकट उभे आहे. अशात यापुढे नोकऱ्या मिळवण्यासाठी काही विशेष कौशल्य असणे देखील आवश्यक असणार आहे.

दरम्यान Microsoft आणि LinkedIn ने अशा टॉप 10 Jobs बाबत शोध घेतला आहे ज्यांची मागणी वाढत आहे. त्याकरता त्यांनी नोकरी करण्यासाठी इच्छूक लोकांना मोफत ऑनलाईन ट्रेनिंग देण्याची ऑफर देऊ केली आहे.

व्यावसायिक Networking sites च्या आकडेवारीनुसार, Corona virus pandemic दरम्यान 10 असे विशेष जॉब्स आहेत. ज्यांच्या मागणीमध्ये चांगली वाढ होत आहेत आणि आगामी काही वर्षात मागणी वाढत राहणार आहे.

● डिजिटल मार्केटर
● आयटी सपोर्ट/ हेल्प डेस्क
● ग्राफिक डिझायनर
● फायनान्शियल अ‍ॅनालिस्ट
● डाटा अ‍ॅनालिस्ट
● सॉफ्टवेअर डेव्हलपर
● प्रोजेक्ट मॅनेजर
● सेल्स रिप्रेझेंटीव्ह
● आयटी अ‍ॅडमिनिस्ट्रेटर
● कस्टमर सर्व्हिस स्पेशलिस्ट