डोळ्यांसाठी लेझर कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरताय? सावधान!

डोळ्यांसाठी लेझर कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरताय? सावधान!


● चष्म्याचा वापर टाळण्यासाठी चष्म्याला एक उत्तम पर्याय म्हणून अनेकांकडून डोळ्यांसाठी लेझर कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरल्या जातात.

● तसेच फॅशन आणि ट्रेंड म्हणून देखील कलर लेन्सेस वापरल्या जातात. मात्र लेन्सेस वापरत असताना काळजी घेणे गरजेचे आहे.

● कारण लेन्सेस वापरत असताना काही धोके देखील असतात. यासाठी लेन्स लावल्यानंतर काळजी घ्यावी.

● लेन्स लावल्यानंतर लेन्स डोळ्यांवर ठेवून  झोपू नका: जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा डोळे कोरडे पडतात डोळ्यांना ऑक्सिजन कमी पडतो अशावेळी लेन्सचा कोरियाला संसर्ग होऊ शकतो.

● चांगल्या दर्जाचे कॉन्टॅक्ट लेन्स सोल्युशन सोबत स्वच्छ बोटाने साफ करा, पाण्याचा वापर करू नका, लेन्स केसमधील सोल्युशन दररोज बदला,

● दर महिन्याला सोल्युशन ची बाटली बदला, लेन्स केस बदला, सहामाही ऐवजी मासिक डिस्पोजेबल लेन्सेस वापरा लेन्स व केस खाली पडल्यास टाकून द्या, पोहताना लेन्सचा वापर करू नका, तसेच लेन्सचा अतिरिक्त वापर टाळा.