गेरविंद्र ठाणगे यांना रंगे हात 10हजाराची लाच घेताना पकडले



बीड येथील तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकास लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी  दुपारी करण्यात आली.

बीड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील निरीक्षक रविंद्र ठाणगे यास 10 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड लाचलुचत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे व त्यांच्या टिमने केली. गेरविंद्र  ठाणगे यांच्या मागील अनेक दिवसापासून तक्रारी होत होत्या. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.