जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमधील २६३ पैकी ९९ व्हेंटिलेटर बंद

जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमधील २६३ पैकी ९९ व्हेंटिलेटर बंद


● बीड जिल्ह्यातील विविध शासकीय आरोग्य संस्थेतील २६३ पैकी ९९ व्हेंटिलेटर बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

● त्यातच सर्वाधिक रुग्ण संख्या उपचार घेत असलेल्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील ६८ व्हेंटिलेटर पैकी पीएम केअरकडून मिळालेली २० व्हेंटिलेटर बंद आहेत. त्यामुळेच गंभीर रुग्णांचे उपचारा अभावी हाल होत आहेत. 

● जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या वाढत आहे. नव्या रुग्णांमध्ये ऑक्सिजन लेव्हल कमी असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. 

● वृद्ध रुग्णांची प्रकृती अचानक खालावल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते, मात्र अशावेळी शासकीय आरोग्य संस्थेतील व्हेंटिलेटर अपुरे पडतात. रुग्ण आणि नातेवाईकांना व्हेंटिलेटर नाही, असे उत्तर देऊन आरोग्य विभाग हात झटकत असल्याचे समोर आले आहे. 

● स्वराती रुग्णालयातील २० व्हेंटिलेटर केवळ दुरुस्ती अभावी बंद आहेत. याचे पार्टस मुंबई पुण्यात मिळत असल्याने याच्या दुरुस्तीसाठी वेळ लागत असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

● दरम्यान माजलगाव आणि आष्टी याठिकाणचे १० व्हेंटिलेटर अद्याप कार्यान्वित नसल्याने धूळ खात पडले आहेत. त्यामुळे रुग्णाला बीड किंवा अंबाजोगाईला रेफर केले जात आहे.