परळीत गावठी पिस्तूलसह एकास अटक

परळीत गावठी पिस्तूलसह एकास अटक


बीड जिल्हा लाईव्ह बातम्या

परळी शहरातील स्वाभिमाननगर मधील एकाकडे गावठी  पिस्तूल असल्याचे गुप्त माहिती मिळताच परळी शहर डी बी पथकाचे भास्कर केंद्रे यांनी सापळा रचुन एकास अटक केली. 

त्यांच्याकडुन गावठी  पिस्तूल मँग्जीनसह जप्त केले आहे. परळी शहर डी बी पथकाचे या कामगिरीने परळीत सर्वत्र कौतुक होत आहे. 

याबाबत पोलिस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की, 16 रोजी राञी 10 चे सुमारास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, परळी येथील स्वाभिमाननगर येथील एक इसम थांबला आहे

त्यांच्याकडे गावठी पिस्टल आहे असी खात्रीलाईक बातमी मिळाल्याने गोपणीय माहीती दिलेल्या वर्णणावरुन त्या इसमास ताब्यात घेवुन त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव संदीप भास्कर फड वय- 30 वर्ष रा. स्वाभिमाननगर परळी वैजनाथ असे सांगितले.

त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कमरेला आतुन ठेवलेला एक गावठी पिस्टल मॅगझीन सह असलेले मिळुन आले त्यांच्या कब्जात असलेल्या गावठी पिस्टलचे लायसन्स विचारले असता त्यांनी त्यांचेकडे शस्ञ बाळगण्याचे कोणतेही परवाना नसल्याचे सांगितले.

त्यांच्या विरुध्द भास्कर केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस स्टेशन गुर.नं 75/2021कलम 3/25 भारतीय हत्यार कायदया प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.