बीडमध्ये तुफान पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला, नागरिकांचे प्रचंड हाल



बीड : जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील आज अचानक दुपारी तूफान पाऊस झाला आहे. पावसामुळे अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे. परडी माटेगाव खापरवाडी देवगाव लवूळ काडीवडगाव आज दुपारच्या दरम्यान अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. पहिल्याच पावसाने नदीवरील पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसापासून पावसाच्या अगोदर प्रशासनाने रस्ते आणि पूलांची काम करणे अपेक्षित असताना काम न झाल्याने पहिल्याच पावसात नदीला आलेल्या पुरामध्ये पूल वाहून गेला आहे. पूल वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

जिल्ह्यामध्ये सध्या पावसाने पहिल्याच काही पावसामध्ये जोरदार हजेरी लावली असून या पावसामुळे आणि पावसाच्या आधी जे काम होणे अपेक्षित होते ते काम पूर्ण झाले नाही. अनेक ठिकाणी अनेक नद्यांना पूर परिस्थिती झाली आहे. अनेक गावांना जोडणारे पूल या ठिकाणी वाहून गेल्याचे दिसत आहेत. आज बीड जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामध्ये वडवणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक गावांचा संपर्क या पहिल्याच पावसाने तुटल्यामुळे अनेक जण ह्या चिंतेत आहेत की पूर्ण पावसाळा आता जाणार कसा? अनेक पुलांचे काम मान्सूनच्या आधी पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र, ते कामे पूर्ण झालं नाही. आणि आता पहिल्या पावसात जर पूल वाहून जात असेल तर पूर्ण पावसाळाभर नागरिकांनी जगायचं कसं हा देखील प्रश्न उभा राहत आहे.