मंत्री ना. धनंजय मुंडे - परळीत मेगा विकास कामांचा शुभारंभ !यात्री निवास,रस्ते आणि 33 केव्ही चे भूमिपूजन
परळीत मेगा विकास कामांचा शुभारंभ !यात्री निवास,रस्ते आणि 33 केव्ही चे भूमिपूजन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात परळी मतदारसंघात विकासपर्व सुरू असून, तीर्थक्षेत्र विकास योजनेतून वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री (भक्त) निवासच्या भव्य इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन ना. मुंडेंच्या हस्ते उद्या गुरुवारी दि. 22 रोजी करण्यात येत आहे. त्याच बरोबर व्ही.आय.पी. सर्किट हाऊस परिसरात उभारण्यात येणाऱ्या नवीन 33 केव्ही सबस्टेशनच्या उभारणी कामाचे व परळी शहरातील दोन महत्त्वाच्या सिमेंट रस्त्याच्या कामांचे देखील यावेळी ना. मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात जुन्या तहसीलच्या जागी भव्य यात्री निवास उभारण्यात येणार आहे. सायंकाळी 5.45 वा. होणाऱ्या या भूमिपूजन समारंभास ना. मुंडे यांच्या सह आ. संजय दौंड, नगराध्यक्षा सौ. सरोजिनिताई हलगे, वैद्यनाथ मंदिर समितीचे सचिव राजेश देशमुख यांच्यासह सर्व विश्वस्त, पदाधिकारी तसेच नगर परिषदेचे सर्व सभापती, पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा