सावधान! पुण्यात हॅकिंगचा नवा पॅटर्न

 




पुण्यातील आयटी कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा लॅपटॉप हॅक करून त्यांच्याकडून लाखों रुपयांची खंडणी मागितल्याच्या घटना उघडकीस येत आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून अज्ञात सायबर चोरट्याचा शोध घेतला जात आहे.


हॅकिंगचा नवा पॅटर्न : 

▪️ अज्ञात सायबर चोरट्यानं फिर्यादीला एक ईमेलद्वारे लिंक पाठवली होती. 

▪️ फिर्यादीनं ही लिंक ओपन करताच, लॅपटॉपनं प्रतिसाद देणं बंद केलं. 

▪️ सायबर चोरट्यानं लॅपटॉपवर पूर्णपणे ताबा मिळवला होता. 

▪️ यामुळे लॅपटॉपमधील अति महत्त्वाचा डाटा सायबर भामट्याच्या हाती लागला होता. 


डाटा परत हवा असेल तर, संबंधित व्यक्तीनं क्रिप्टो करन्सीच्या रुपात वीस लाख रुपये देण्याची मागणी आरोपीनं केली होती. 

▪️ या संदर्भातील अशीच एक घटना पुण्यातील अन्य एका आयटी अधिकाऱ्याच्या बाबतीत घडली होती.

▪️ आरोपीनं संबंधित अधिकाऱ्याकडे 50 लाख रुपयांची मागणी केली होती. 

▪️ दोन्ही फिर्यादीनं आरोपींच्या दबावाला बळी न पडता पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 


दरम्यान, अज्ञात व्यक्तीनं ईमेलवर अशाप्रकारे लिंक पाठवल्यास ती ओपन करू नये, असा सल्ला सायबर पोलिसांकडून देण्यात आला आहे.