धनंजय मुंडेंच्या कामाचा अभिमान -सुप्रिया सुळे
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राज्यभरातील दिव्यांग व्यक्तींना राज्य सरकार, केंद्र सरकार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अशा विविध माध्यमातून विविध सहाय्यक उपकरणे मिळवून देण्याची एक आगळी वेगळी यशस्वी चळवळ सुरू झाली आहे.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या या कामाचा अभिमान असल्याचे मत खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
परळी येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिर येथे ५८५ गरजू दिव्यांग व्यक्तींना सुमारे २५ हजार रुपये किमतीचे डिजिटल श्रवण यंत्र मोफत वाटप करण्यात आले, या कार्यक्रमात खा. सुप्रिया सुळे ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या.
जन्मजात कर्णबधिर असलेल्या किंवा काही कारणांनी श्रवणशक्ती गमावलेल्या व्यक्तीच्या कानात जेव्हा आपल्या प्रयत्नातून आवाज ऐकू येतो, त्याचे समाधान अन्य कोणत्याही मोठ्या कामापेक्षा श्रेष्ठ ठरते, असे मत यावेळी सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा