बीड हादरले ४०० जणांकडून बलात्कार पोलिसासह माजी नायब तहसिलदाराला बेड्या
Beed news today
बीड : अंबाजोगाई (Ambajogai News) अल्पवयीन बलात्कार प्रकरणी (Rape Case Ambajogai) एका पोलिस कर्मचाऱ्यासह, होमगार्ड आणि सेवानिवृत्त नायब तहसिलदाराला बेड्या घालण्यात आल्या आहेत. या अटकेच्या कारवाईमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर अवघ्या २४ तासात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ( Beed district News )
अंबाजोगाईत मागच्या ६ महिन्यांपासून घराबाहेर पडलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपुर्वी उघडकीस आली होती. या प्रकरणात ८ नोव्हेंबरला अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
मात्र त्यानंतर यात अनेक धक्कादायक बाबी पुढे येत गेल्या. १७ नोव्हेंबर रोजी या प्रकरणात पोलिसांनी २ महिला दलाल, एका मुख्याध्यापकासह इतर ७ जणांना अटक केली होती. या प्रकरणात एका पोलिस कर्मचाऱ्याचाही सहभाग आढळून आला होता. मात्र त्याच्यावर अटकेची कारवाई होत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.
News Credit Sarkarnama beed
टिप्पणी पोस्ट करा