23 डिसेंबर 2022: सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना एअर सुविधा फॉर्ममध्ये 72 तासांपूर्वीच्या आरटीपीसीआर चाचणीची माहिती देणे आवश्यक, 24 डिसेंबरपासून रँडमली कोविड चाचणी होणार



सर्व विद्यार्थ्यांची आधार जोडणी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना, मात्र तोपर्यंत कोणत्याही कारणास्तव योजनांच्या लाभापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्यात येणार नाही – शालेय शिक्षण मंत्री

 चीनच्या कुरापती: कैलास पर्वतरांगांतील भारताच्या सामर्थ्याने खवळला चीन; लडाखमध्ये सैनिक वाढवले

कंत्राटी कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा महामंडळाच्या पद्धतीने विमा संरक्षण देण्यात येईल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत माहीती

कोरोना विषाणूचा बीएफ 7 या नव्या व्हेरियंटचा महाराष्ट्रात एकही रुग्ण नाही, नागरिकांनी घाबरुन न जाता दक्षता म्हणून मास्कचा वापर व गर्दीत सुरक्षित अंतर ठेवावे – आरोग्यमंत्री

साहित्य अकादमी पुरस्कार 2022 जाहीर, मराठी भाषेतील साहित्यासाठी प्रवीण दशरथ बांदेकर यांना `उजव्या सोंडेच्या बाहुल्या` या कादंबरीसाठी पुरस्कार

मुख्य सचिवांनी तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन पंचसुत्रीचे काटेकोर पालन होईल हे पाहावे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे कोणत्याही स्थितीत खाजगीकरण करण्याचा शासनाचा विचार नाही, विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहीती

आदिवासी पदांच्या भरतीसाठी कालबद्ध पद्धतीने भरती तातडीने राबविणार, मंत्री दीपक केसरकर यांची माहीती

राज्यातील 20 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय नाही; लवकरच शिक्षक आणि शिक्षकेतर पद भरतीची प्रक्रिया सुरू करणार- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर