इंजेक्शन नव्हे आता नाकावाटेही देणार लस
करोना संदर्भातील आरोग्य तज्ज्ञांच्या समितीने पौढांसाठी नकावाटे देणाऱ्या करोना लसीला मंजुरी देत बुस्टर डोस म्हणून नेझल करोना लशीची शिफारस केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी अधिवेशनात नेझल व्हॅक्सिन आता १८ वर्षावरील नागरिकांना वापरता येईल, असं म्हटलं आहे. येत्या काही दिवसांत थेट नाकावाटे करोना लस देण्यात येईल. मात्र, सुरुवातीला ही लस फक्त खासगी रुग्णालयातच मिळणार आहे.
दरम्यान, हैदराबाद येथील भारत बायोटेक इंटरनॅशनल या कंपनीने तयार केलेल्या ‘इनकोव्हॅक’ या लशीला मंगळवारी भारतीय औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली होती. भारत बायोटेकच्या ‘इनकोव्हॅक’ या लशीच्या दोन मात्रा असतील. तसेच यापूर्वी कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांना बुस्टर मात्रा म्हणूनही ही लस घेता येईल. यासाठी कंपनीने तीन निरनिराळ्या चाचण्या घेतल्या होत्या. सुमारे चार हजार स्वयंसेवकांवर त्याच्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी कुणामध्येही आरोग्यविषयक गुंतागुंत उद्भवली नाही, असे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले होते.
काय आहेत फायदे?
नाकावाटे घेण्याच्या या लशीमुळे नाकाच्या वरील भागात प्रतिजैविके तयार होतात व त्यामुळे करोनाचा संसर्ग रोखणे व रोगाची बाधा टाळणे शक्य होईल.
लसीकरणानंतर होणार वेदना टाळता येणार
नेसल व्हॅक्सिनचा वापर करणं अगदी सोपं होणार आहे. घरातच तुम्ही लशीचा डोस घेऊ शकता. मात्र, त्यासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुचनेचे काटेकोर पालन करावे लागेल.
टिप्पणी पोस्ट करा