(Crime News) मित्रानेच मित्राच्या प्रियकरावर शरीसंबंधांसाठी आग्रह केला



उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधून पोलिसांनी एका तरुणीच्या हत्येच्या धक्कादायक घटनेचा उगलडा केला आहे. आरोपींनी सुरुवातीला या तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने नकार देताच या नराधमांनी चाकूने भोसकून तिच्या शरीराची चाळण केली. (Crime News) अखेरीस जेव्हा चाकू तिच्या मणक्यामध्ये अडकला तेव्हा आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या प्रियकरासह ३ जणांना अटक केली आहे.

लखनौमधील सरोजिनीनगर परिसरातील पोलिसांनी एका तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला होता. यादरम्यान या तरुणीची ओळख स्कूटर इंडिया येथील रहिवाशाच्या रूपात पटली. ती मुळची सीतापूर येथील रहिवासी होती. कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांची मुलगी १२ जून रोदी संध्याकाळी बेपत्ता झाली होती. त्यावेळी तिचे वडील ड्युटीवर गेले होते, तर आई तिच्या गावी होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर तरुणी मोहम्मद कैफ नावाच्या तरुणासोबत फोनवर बोलत असे. तो तरुण सरोजिनीनगरमधील रहिवासी होती. गेल्या एक महिन्यापासून ही तरुणी त्याच्याशी बोलत होती. १२ जून रोजी तरुणीने मोहम्मद कैफला सांगितले की, तिचे वडील घरी नाहीत, तर आई गावात गेली आहे. हे समजल्यावर कैफने तिला बाहेर फिरायला जाण्यासाठी तयार केले.