पत्नीने पतीवर केला बलात्कार, वाचा सविस्तर

28 वर्षांच्या एका नवविवाहित महिलेने आपल्या पतीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेचा पती तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणं वारंवार टाळायचा. अखेर एके दिवशी रात्री तो झोपलेला असताना तिने त्याच्यावर जबरदस्ती केली. सकाळी उठल्यावर हा प्रकार पतीच्या लक्षात आला. मग त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं, अन् पत्नी विरोधात पोलीस तक्रार केली. हा प्रकार पाहून पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. कारण पत्नीनं केलं त्याला खरंच बलात्कार म्हणायचं का? असा प्रश्न त्यांना पडला आहे.

द सनच्या 'डियर डाईड्री' या मालिकेत महिलेने स्वत: हा अनुभव सांगितला. या मालिकेत सर्वसामान्य लोक आपल्या आयुष्यातील काही चित्रविचित्र घटना शेअर करतात. या महिलेच्या लग्नाला 1 वर्ष उलटून गेलं आहे. परंतु तिच्या पतीला शारीरिक संबंध ठेवण्यात फारसा रस नव्हता. तो दररोज रात्री ऑफिसमधून उशीरा यायचा आणि झोपून जायचा. या प्रकारामुळे महिला त्रस्त होती. तिने आपल्या पतीसोबत अनेकदा यावर चर्चा देखील केली. परंतु ऑफिसच्या कामामुळे पत्नीला वेळ देणं अशक्य होत असे. अखेर एके दिवशी पती झोपलेला असताना पत्नीने त्याच्यासोबत सेक्स केलं. मात्र दुसऱ्या दिवशी तिने स्वत:हून हा प्रकार आपल्या पतीला सांगितला.

त्यानंतर मात्र पती संतापला आणि त्याने थेट पत्नीवर बलात्काराचे आरोप केले. एवढंच नाही तर त्याने पत्नी विरोधात पोलीस तक्रार देखील केली. परंतु हे प्रकरण पाहून पोलीस देखील चक्रावले. कारण पतीने केलेले आरोप खरे असले तरी तो देखील तिच्यावर अन्याय करतोय असं मत पोलिसांचं होतं. परिणामी समोपचाराने यावर तोडगा काढा. हा पर्याय पोलिसांनी सुचवला. अखेर पोलिसांच्या मध्यस्तीमुळे पती आणि पत्नीमधील हा वाद मिटला.