परळी हादरली 24 वर्षीय तरुणाने ....



सोलापूर येथील मूळ रहिवाशी असलेल्या महिलेला नोकरी लावतो, घर बघून देतो असे आमिष दाखवून बलात्कार करण्यात आल्याची घटना परळीत घडली. याबाबत परळी शहर पोलीस ठाण्यात संबंधित महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार असलेल्या 38 वर्षीय महिलेला परळीतील रहिवाशी असलेल्या एका 24 वर्षीय तरुणाने फूस लावली. नोकरी लावतो, राहण्यासाठी रूम बघून देतो असे आश्वासन देऊन परळीत आणले होते. 

दि.19 व 20 नोव्हेंबर रोजी तक्रारदार महिलेवर अतिप्रसंग केला अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, पोलिस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.भार्गव सपकाळ, सपोनि.पेंटकर यांच्यासह पोलीस अधिक तपास करत आहेत.