कोरोना रुग्णांकडून किती दिवसांपर्यंत संसर्गाचा धोका कायम असतो?
● देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. यामध्ये दररोज सापडणाऱ्या रुग्णांची संख्या 4 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.
● यामध्ये दररोज कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. मात्र या कोरोना मुक्त होणाऱ्यांकडून संसर्गाचा धोका किती दिवसांपर्यंत आहे ? हा देखील प्रश्न आहे.
● डॉक्टर विनीत चड्ढा यांनी यावर एका वेबिनारमध्ये बोलताना सांगितले की, कोरोना आजार झाल्यानंतर 10 दिवसानंतर संसर्ग पसरवत नाही.
● त्यामुळे जर रुग्ण होम आयसोलेशनमधील रुग्णाला 3 ते 4 दिवसांपासून ताप किंवा इतर लक्षणे दिसली नाही तर त्या रुग्णाला सर्टिफिकेटची आवश्यकता नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
● विविध हॉस्पिटल मधील 73 संक्रमित यांचा अभ्यास केल्यानंतर सिंगापूर येथील राष्ट्रीय संसर्गजन्य रोग केंद्राने मागच्या वर्षीच्या अभ्यासात हा दावा केला होता. की रुग्ण 10 दिवसांनंतर संसर्ग मुक्त होतो.