कॅमेरा कुठे आहे? अॅमेझॉनवरुन ऑर्डर केला दीड लाखांचा कॅमेरा, काय आलं पाहा हा VIDEO
वैश्विक महासाथ कोरोना (Global Epidemic Corona) मुळे देशातील अनेक भागात लॉकडाऊन अद्याप सुरू आहे. कोरोना व्हायरसमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती खालावली आहे. व्हायरसच्या संपर्कातून बचाव करण्यासाठी या दिवसात लोक मोठ्या प्रमाणात ऑनलाइन शॉपिंग करीत आहेत. मात्र या ऑनलाइन शॉपिंगमध्येही हैराण करणारी एक बातमी समोर आली आहे. सुमित चौहान यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी ऑनलाइन शॉपिंग करीत कॅमेरा मागविला होता. सुमित यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon नमधून कॅमेरा मागविला होता. Amazon Frod
सुमितने 27 ऑगस्ट रोजी Amazon वरुन आपल्या क्रेडिट कार्डावरुन 1.40 लाखांचा कॅमेरा बुक केला होता. कॅमेरा जेव्हा घरी आला तेव्हा त्याने तोंडात बोटंच घातली. Amazon नहून डिलीव्हरी झालेले बॉक्समध्ये जुने शूट आणि दगड होते. यामध्ये चांगली बाब म्हणजे सुमितने Amazon नच्या पॅकेटची अनबॉक्सींगचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. ज्यामध्ये बॉक्स उघडला तेव्हा त्यात कॅमेरा नव्हता तर फाटलेले जुने शूज आणि दगड होते. Amazon Frod Case
#Fraud_by_Amazon मैंने @amazonIN को Panasonic Lumix GH5 कैमरे के लिए 1.40 लाख रुपये दिए और बदले में @amazon मुझे फटे-पुराने जूते और पत्थर से भरा बॉक्स पकड़ा गया। अमेज़न इंडिया हेड @AmitAgarwal ने शायद तरक्की का नया रास्ता निकाला है। pic.twitter.com/iTunT6uwbc
— Sumit Chauhan (@Sumitchauhaan) September 3, 2020
पॅकेटमध्ये फाटलेले शूट आणि दगड मिळाल्यानंतर सुमितने पॅकेटवर दिलेल्या डीलरच्या नंबरवर फोन केला. ज्यावर सुमितने डिलरला उत्तर दिलं की त्यांच्याकडून खरा कॅमेरा पाठविण्यात आला होता. डीलरचं उत्तर मिळाल्यानंतर त्यांनी Amazon शी संपर्क केला. अनेकदा इमेल केल्यानंतर Amazon ने उत्तर दिलं की ते या प्रकरणाचा तपास करीत आहे. ग्राहकांच्या या अनुभवासाठी त्यांनी माफी मागितली आहे.
टिप्पणी पोस्ट करा