धान्य जादा दराने विकल्याने रामेश्वरवाडीचे रेशन दुकान निलंबीत
कोरोना काळात गोरगरीबांना मदत व्हावी यासाठी शासनाच्या वतीने मोफत धान्य पुरवठा केला जात आहे. मात्र यामध्ये रेशन माफिया घोळ घालत असून मोफतचे धान्य काळ्या बाजारात विकत आहेत. रामेश्वरवाडी येथील रेशन माफियाने असाच प्रकार केला असून मोफत आलेले धान्य लोकांना विकत दिले आणि विकतचे धान्य जादा भाव लावून गरीबांना दिले. या प्रकरणाची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार येताच चौकशी करून रामेश्वरवाडीचे रेशन दुकान तडकाफडकी निलंबीत केल्याने रेशन माफियात खळबळ उडाली आहे.
रामेश्वरवाडी येथील दुकानदार बंडु आंधळे हे गोरगरीबांना धान्य देण्यास टाळाटाळ करत होते. शासनाने दिलेले मोफत धान्य ते नागरीकांना विकत देत होते. विकत आलेले धान्य जादा भावाने नागरीकांना वाटप करत होते. याबद्दल जिल्हाधिकारी यांच्याकडे हनुमान माळी व इतर लोकांनी रितसर तक्रार दिली होती.
या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी यांनी स्वस्त धान्य दुकानाची सखोल चौकशी करण्यासाठी आदेश देवून टि.बी.सिरसेवाल नायब तहसीलदार वडवणी व बी.डी.घोलप अ.का.तहसील कार्यालय पाटोदा यांचे पथक नियुक्त केले होते. त्या पथकाने रामेश्वरवाडीचे दुकान तपासून अहवाल सादर केला यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या.
टिप्पणी पोस्ट करा