हरभरा खरेदीत व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची लुट



रब्बीच्या हंगामामध्ये हरभर्‍याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हरभरा खरेदीसाठी शासनाने हमीभाव केंद्र सुरू केले. मात्र हे हमीभाव केंद्र नावालाच ठरू लागले. फक्त दोन दिवस हमीभाव केंद्र सुरू झाले. नंतर हे केंद्र बंद पडल्याने शेतकर्‍यांना, खासगी व्यापार्‍यांना हरभरा विकावा लागत आहे. हमीभाव आणि व्यापार्‍याच्या भावात 1100 रूपयाचा फरक येत असल्याने व्यापार्‍याकडून शेतकर्‍यांची लुट होत आहे. 

शेतकर्‍यांच्या लुट थांबविण्यासाठी हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात आहे. मागच्या वर्षी रब्बी हंगामामध्ये बीड जिल्ह्यात 30 ते 35 हजार हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड करण्यात आली होती. बहुतांश शेतकर्‍यांना हरभरा पिकातून मोठ्या प्रमाणात उत्पादन निघाले. 

शासनाने हमीभाव केंद्र सुरू असले तरी हे केंद्र फक्त नावाला ठरू लागले. दोन दिवस केंद्र सुरू झाले नंतर मात्र बंद पडले. केंद्र सुरू नसल्याने खासगी व्यापार्‍यांना, शेतकर्‍यांना हरभरा विकण्याची वेळ आली. हमीभाव केंद्र आणि व्यापार्‍याच्या भावात 1100 रूपयाच्या भावाची तफावत येवू लागली. व्यापारी शेतकर्‍यांची लुट करत असून ही लुट थांबविण्याची मागणी केली जात आहे. 

दरम्यान बीड तालुक्यातील उदंडवडगाव येथील नंदलाल चव्हाण या शेतकर्‍याकडे आज 20 क्विंटल हरभरा पडून आहे. ऑनलाईन करण्यासाठी शासकीय हमीभाव केंद्रावर कागदपत्र दिले मात्र वेळ कमी असल्यामुळे ऑनलाईन होवू शकले नाही म्हणून त्यांचा हरभरा खरेदी अभावी पडुन आहे. शासनाने शेतकर्‍यांची लुट थांबविण्यासाठी हमीभाव केंद्र सुरू करावे अशी मागणी अभिमान अवचर या शेतकर्‍याने केली आहे.