डिजिटल पेमेंटच्या व्यवहारांमध्ये वाढ, महाराष्ट्र कोणत्या स्थानी? वाचा!

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                             डिजिटल पेमेंटच्या व्यवहारांमध्ये वाढ, महाराष्ट्र कोणत्या स्थानी? वाचा!


⚡ नोटबंदीनंतर सरकारने डिजिटल पेमेंटच्या व्यवहारांमध्ये वाढ होण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न अद्यापही पूर्णपणे सफल झालेले दिसत नाहीत. मात्र, या व्यवहारामध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. 

📲 वर्ल्डलाईन इंडियाने जून ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये झालेल्या डिजिटल पेमेंटबाबतचा एक अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. त्यामधून बाहेर आलेल्या माहितीमुळे या व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. 

☑️ महाराष्ट्र पहिल्या स्थानी : जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये फिजिकल टच पॉईंटवर झालेल्या एकूण व्यवहारांचे विश्लेषण करून सर्वाधिक व्यवहार असलेल्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानी विराजमान आहे. 

💫 यामध्ये, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक,आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल हे राज्य सर्वाधिक व्यवहार असलेल्या दहा राज्यामध्ये येतात. 

🤔 या वस्तूंची होते जास्त खरेदी : किराणा, रेस्टॉरण्ट, कपडे, औषधे आणि वैद्यकीय साहित्य, दागदागिने आणि घरगुती वापराच्या वस्तू, ऑनलाईन खरेदी वस्तू आणि सेवा, गेम्स व आर्थिक सेवा यांचा सर्वाधिक भरणा दिसून आला आहे. 

💳 क्रेडिट कार्ड व्यवहारांत 11 टक्के वाढ : या तिमाहीमध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्डांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. देशामध्ये सप्टेंबर अखेर 98.53 कोटी कार्ड आहेत. 

💰 व्यवहार वाढले : क्रेडिट कार्डावरून 55.72 कोटी व्यवहार झाले असून त्यामधून 2.32 लाख कोटी रुपये दिले गेले आहेत.

● यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये 103 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

● या तिमाहीमध्ये 30 नवीन बँकांनी यूपीआय प्रणालीमध्ये आपला प्रवेश केला आहे.