आता गर्भवती महिलांना देखील दिली जाणार कोरोना लस?



Covid Helpline

● देशात कोरोना लसीकरण सुरु झाले असून नुकतेच १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत  लोकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. यामध्ये आता आयसीएमआरने हे संभ्रम दूर केले आहेत.

● आयसीएमआर डीजी बलराम भार्गव म्हणाले, 'आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईननुसार गर्भवती महिलांना लस दिली जाऊ शकते. लसीकरण गर्भवती महिलांसाठी उपयुक्त असून त्यांनी ते करावे'. त्यामुळे आता गर्भवती महिलांना देखील लस मिळू शकते.

●  देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना डेल्टा व्हेरियंटचा धोका वाढला आहे. दरम्यान, तज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट भारतात येण्याची शक्यता वर्तविली आहे त्यामुळे देशात सध्या चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सर्वाना कोरोना लस मिळणे गरजेचे आहे.