बीड जिल्ह्यात आज १७६ पॉझिटिव्ह रुग्ण



बीड जिल्ह्यात आज दि. २५ रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील ३,७८६ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात १७६ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर ३,६१० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई ३, आष्टी ६३, बीड १३, धारूर ३, गेवराई २४, केज १४, माजलगाव ६, पाटोदा २८, परळी ४, शिरूर १५, वडवणी ३ असे रुग्ण आढळून आले आहेत.