जाणून घ्या! निपाह व्हायरसची कशी होते लागण? लक्षणे आणि उपचार


 Know! How does nipah virus get infected? Symptoms and Treatment

● कोरोना संसर्गाचा सामना करत असताना आता सामन्यांच्या चिंतेत भर घालणारी अजून एक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच निपाह व्हायरस आढळून आला आहे. 

● पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या (NIV) शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामध्ये महाबळेश्वरमधील वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये ‘निपाह’ व्हायरस आढळून आला आहे. या विषाणूची लागण कशी होते आणि त्यावर उपचार कसे केले जातात, याबद्दल जाणून घेऊयात….

● हा व्हायरस २००१ मध्ये पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे निपाह विषाणू सापडला होता. त्यावेळी ६६ रुग्ण आढळले होते. त्यापैकी ४५ रुग्णांचा मृत्यु झाला होता. 


● निपाहाची लक्षणे :

* प्रचंड ताप येणे

* डोकेदुखी

* स्नायू दुखी

* उलट्या होणे

* मन आखडणे

* प्रकाशाची भीती वाटणे

* मानसिक गोंधळ

* छातीत जळजळणे

* चक्कर येणे

* बेशुद्ध पडणे


●व्हायरसची लागण कशी होते ?

वटवाघूळ हा नैसर्गिक वाहक असल्याने वटवाघळांनी खाल्लेली किंवा चाटलेली फळं खाल्ल्यानं निपाहचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसंच, एखाद्या व्यक्तीला निपाह विषाणूचा संसर्ग झाला असेल तर त्या व्यक्तीपासून इतर व्यक्तीला देखील याचा संसर्ग होऊ शकतो. 

● निपाह व्हायरस वर उपचार कोणते ?

या आजारावर अद्याप कोणतेही औषधे व लस सापडलेली नाही, त्यामुळे या विषाणू संसर्गावर थेट उपचार करता येत नाही. एखाद्या व्यक्तीला जर संसर्ग झाल्याचे लक्षात येताच त्यांना प्राथमिक उपचार केले जातात. 

● महत्वाची गोष्ट :

हा निपाह व्हायरस एका वटवाघळाकडून कोणत्याही दुसऱ्या वटवाघळाला संसर्ग होत नाही. जर एका वटवाघळाला या विषाणूची लागण झाल्याने दुसऱ्या वटवाघळांमध्ये ‘अ‍ॅन्टीबॉडीज’ तयार होतात.