आमदार संदीप क्षीरसागरांनी पोखरीच्या कुटुंबाला दिला आधार



मुसळधार पावसात घर वाहून गेलं, सारा संसार मोडून पडल्याची माहिती संदीप भैय्या क्षिरसागर यांना या घटनेची माहिती मिळताच संसार उपयोगी साहित्य, जीवन आवश्यक वस्तू देत सदर कुटुंबाला आधार दिला आहे.

त्याचबरोबर शासनाची सर्वोप्तरी मदत मिळून देण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली. बीड तालुक्यातील अनेक गावात मुसळधार पावसाने पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, घरांची पडझड झाली. 

याची पाहणी करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, बीडचे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर, माजी आमदार सुनील धांडे, महसूल, कृषी विभागातील अधिकारी बकरवडी, घटसावळी, पोखरी परिसरात आले होते. 

पोखरी येथील शेतकरी रामभाऊ काळे यांचे पावसात घर वाहून गेले असल्याने त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. आमदार संदीप क्षीरसागर यांनी शासनाची मदतही मिळेल, तोपर्यंत शक्य असेल तेवढी मदत आपल्याला मिळेल असे सांगितले.