बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात; आत्तापर्यंत 'एवढ्या' जणांचे मृतदेह हाती

बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात; आत्तापर्यंत 'एवढ्या' जणांचे मृतदेह हाती ● तामिळनाडूमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावतदेखील या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते ● या अपघातानंतर भारतीय हवाई दलाने पहिली प्रतिक्रिया देताना जनरल बिपीन रावत हेलिकॉप्टरमध्ये होते या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ● या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कर अधिकारी असे एकूण 14 जण प्रवास करत होते. ● सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं असून अपघातात आत्तापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ● माहितीनुसार, या अपघातात CDS बिपीन रावत जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.