बंदुकीचा धाक दाखवत दरोडा; घटना सीसीटीव्हीत कैद!

 बंदुकीचा धाक दाखवत दरोडा; घटना सीसीटीव्हीत कैद!




● पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे चार दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून इलेक्ट्रॉनिक्स दुकानावर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे.

● ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. 

● माहितीनुसार, आळेफाटा येथील बोरी बुद्रुक येथे अविनाश पटाडे यांचे साई इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. सोमवारी रात्री चार अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश करुन त्यांना बंदुकीचा धाक दाखविला.

● बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी दुकानातील रोख रक्कम चोरून नेली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

● दरम्यान तालुक्यात वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे