गेल्या अनेक दिवसापारून हे डॉक्टर उपलब्ध नाहीत उपजिल्हा रुग्णाल गेवराई



गेवराई  येथील उपजिल्हा रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसांपासून प्रसूती विभागात स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने, गरोदर महिलांना बीडला रेफर केले जात आहे. दरम्यान, कोविड काळात चांगली सेवा देणाऱ्या या रुग्णालयाचा कारभार काही दिवसांपासून ढेपाळत चालला असल्याने, रुग्णांच्या आरोग्याचा विषय गंभीर झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर असलेले हे रुग्णालय बडा घर अन पोकळ वासा..! अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.पन्नास खाटांचे गेवराई उपजिल्हा रुग्णालय राष्ट्रीय महामार्गावर असून येथे ट्राॅमा सेंटरची सुविधा आहे. रुग्णालय तालुक्याच्या मध्यभागी असल्याने, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात असते. तसेच, या रुग्णालयात महिन्याला जवळपास दोनशे महिला बाळंतपणासाठी दाखल होतात. रुग्णालयातला डिलीव्हरी विभाग सुसज्ज असून, काही अडचण आल्यास येथे सिझरची सोय उपलब्ध आहे. पाच सहा हजाराची औषधी बाहेरून आणून द्यावी लागतात. असे असले तरी, गोरगरीब समाजातील महिलांना सरकारी दवाखान्यातला हा खर्च परवडतो. खाजगी रुग्णालयात बाळंतपणासाठी पाच ते सात आणि

सीझर साठी तीस ते पन्नास हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नाही. एकाने राजीनामा दिला असून, डॉक्टर रांदड रजेवर गेले आहे. सेवेत असलेल्या परिचारिका डिलिव्हरी साठी आलेल्या महिलांची तपासणी करतात. डॉक्टर नसल्याने रुग्णांचे नातेवाईक काढता पाय घेत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश शिंदे यांच्या कार्यकाळात असलेली यंत्रणा ढासळली असून, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महादेव चिंचोलीकर यांना ढासाळलेल्या व्यवस्थेवर जालिम उपाय करावा लागेल. नसता, बडा घर अन पोकळ वासा, अशी रुग्णालयाची अवस्था होईल. zunjar neta beed marathi news paper