मोठी बातमी! राज्यात 15 जुलैपासून शाळांची घंटा वाजणार



कोरोना नियंत्रणात आल्या नंतर आता राज्यातील शाळा सुरु होणार आहेत 15 जुलैपासून कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी ही माहिती दिली.

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य सरकारच्या शिक्षण विभागातने शाळा सुरु करण्याचा निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर आता शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शाळा सुरु होणार असल्या तरी त्यासाठी काही नियम आखून देण्यात आले आहेत. या नियमात बसणाऱ्या ठिकाणच्या शाळाच सुरु होऊ शकणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले शाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर करताना काही सूचना देण्यात आल्या आहेत


या असतील त्या सूचना

● ज्या गावात एक महिन्यापासून कोरोना नसेल

● कोरोना संदर्भात गावकऱ्यांमध्ये जागृकता असेल अशा गावात 

● गाव पातळीवरील समिती म्हणजेच सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, वैद्यकीय अधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्यामाध्यमातून निर्णय घेण्यात येईल 

● गावात भविष्यात देखील कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची योजना असेल अशा ठिकाणी शाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.