विवाहितेला विषारी औषध पाजून खून



एका विवाहीत महिलेला नवरा, सासू, सासरा, दिरानी मिळून शारिरीक व मानसिक छळ करून तिला बळजबरीने विष पाजून खून केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला असून दरम्यान, सासरच्या लोकांविरोधात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी करून महिलेच्या नातेवाईकांनी गेवराई पोलीस ठाण्यासमोर मुलीचा मृतदेह ठेवून ठिय्या दिला. 

उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष बाब म्हणजे, महिलेचा मृत्यू होताच नवरा व अन्य लोकांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

कांचन (कविता) विशाल राठोड, ( वय, 26 ) रा. सिद्धीविनायक नगर मध्ये तिच्या सासरी राहत होती. कोणत्या तरी कारणावरून सासरचे लोक तिचा मानसिक, शारीरिक त्रास देऊन छळ करीत होते. 

10 जून रोजी तिला बळजबरीने नवरा, सासू, सासरे आणि दिराने मिळून तिला विष पाजले असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे.