बीड शहरात चार ठिकाणी कोरोना तपासणी केंद्र नागरिकांनो, जिल्हा रुग्णालयातच गर्दी करू नका



बीड : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने बीड शहरात चार ठिकाणी कोरोना तपासणी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे.

 मात्र नागरीक जिल्हा रुग्णालयातच मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. इतर ठिकाणी कोरोना चाचणीसाठी रुग्ण जात नसल्याने नागरिकांनी त्या तीन सेंटरवर जाण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.

बीड शहरात कोरोना चाचणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालय, शासकीय आयटीआय, राजीव गांधी चौक आणि पशूवैद्यकीय दवाखाना या चार ठिकाणी कोरोना चाचणी सेंटर उभारण्यात आले आहे. 

मात्र नागरिक जिल्हा रुग्णालयातच कोरोना चाचणी करण्यासाठी गर्दी करतात. इतर केंद्रांवर चाचण्यासाठी नागरिक जात नाहीत. केवळ 40 ते 50 चाचण्याच या केंद्रांवर होता. त्यामुळे नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी न करता इतर तीन केंद्रांवर आपली चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.