विराट कोहलीचे काही आगळेवेगळे शैक

 भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या उत्कृष्ठ खेळामुळे जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील नंबर १ चा खेळाडू विराट कोहली सध्या जगातील श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. विराट कोहलीचे एकूण उत्पन्न जवळ जवळ ९०० करोड रुपये इतके आहे. यामधील सर्वात जास्त उत्पन्न हे जाहीरात आणि स्टार्टअप मधून येते.



विराटजवळ सध्या अनेक महागडे ब्रॅण्ड्स आहेत, ज्यांची तो जाहीरात करतो. १ इंस्टाग्राम पोस्ट मधून करोडो कमावणारा विराट ब्रॅण्ड एंडोर्समेंट शिवाय रेस्टोरेंट, जिम, फॅशन ब्रॅण्ड आणि इंश्योरेंस स्टार्टअप डिजिट आणि स्टेपाथलोन किड्स एंड स्पोर्ट्स कॉन्वो मध्ये गुंतवणूक करून देखील करोडो कमवतो. हे होते विराटच्या कमाईचे आकडे. आता जरा विराटच्या या ५ महागड्या वस्तूंबद्दल जाणून घेऊया.

रोलेक्स कॉसमोग्राफ डेटोना रेनबो एव्हरोज गोल्ड

विराट कोहली महागड्या घड्याळांचा शौकीन आहे. नुकतेच एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये विराट घरी रोलेक्स कॉसमोग्राफ डेटोना रेनबो एव्हरोज गोल्ड घड्याळ घातलेला पाहायला मिळाला होता. ज्याची किंमत ८.६ लाख रुपये इतकी आहे. इतर सुविधांसोबत या लग्झरी घड्याळाची किंमत ६९ लाख रुपये इतकी आहे.

बेंटली फ्लाइंग स्पर

विराटला लग्झरी गाड्यांची खूप आवड आहे. विराटने नुकतेच आपल्या कार्सच्या कलेक्शनमध्ये बेंटले फ्लाइंग स्पर सामील केली आहे. यूनीक मॅट्रिक्स हेडलॅम्प्स, ६.० लिटर आणि डब्ल्यू १२ इंजिनसह, कार प्रेमींसाठी हि गाडी स्वर्गापेक्षा कमी नाही. या लग्झरी कारची किंमत ३.७४ पासून ३.९७ करोड रुपयांच्या दरम्यान आहे.

ऑडी आरएस ५ कूप

विराटची ऑडी इंडियासोबत भागीदारी आहे. विराटने ऑडीच्या अनेक प्रकारच्या कार्सला लॉन्च केले आहे. विराटजवळ सध्या या कंपनीची ऑडी आरएस५ कूप लग्झरी कार आहे ज्याची किंमत १.१० करोड रुपये इतकी आहे.

मुंबईतील पेंटहाऊसदिल्लीचा राहणारा विराट अनुष्का शर्मासोबत लग्न केल्यानंतर मुंबई शिफ्ट झाला आहे. विराट आणि अनुष्का मुंबईमध्ये वरळीच्या प्रसिद्ध ओमकार १९७३ टॉवरमध्ये राहतो. जवळ जवळ ७१७१ चौरस मीटर भागात पसरलेल्या या पेंटहाऊसची किंमत ३४ करोड रुपये इतकी आहे.

गुरुग्राम येथील घरदिल्लीच्या एनसीआरच्या गुरुग्राम येथे विराट कोहलीचा एक आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत जवळ जवळ ८० करोड रुपये सांगितली जाते. विराटच्या या घराला उत्तर भारतातील प्रसिद्ध डिझाइन कंपनी कॉन्फ्ल्यून्सने डिझाइन केले आहे. या आलिशान बंगल्यामध्ये विराटची आई आणि त्याच्या मोठ्या भावाचे कुटुंब राहते.

विराट या वर्षी १९५ करोड रुपये कमाईसोबत फोर्ब्सच्या सर्वाधिक पेड अॅथलीट्स २०२० यादीमध्ये सामील होणारा एकमेव भारतीय आहे. २०१९ मध्ये देखील विराट सर्वात जास्त कमाई करणारा भारतीय खेळाडू होता.