नेहा कक्कर लग्नाच्या बंधनात अडकणार Neha Kakkar will get married

 


नेहा कक्कर लग्नाच्या बंधनात अडकणार


बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायक नेहा कक्करच्या (Neha Kakkar) लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. याआधी तिच्या लग्नासंबंधी अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण आता तिने लग्नाचा मुहूर्तही ठरवला असल्याचं बोललं जात आहे. खरंतर, इंडियन आयडल या रिअ‍ॅलिटी शोमुळे नेहा आणि आदित्य नारायण हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असून ते लग्न करणार असल्याची अफवा उठली होती. पण त्यांची ही लव्ह केमेस्ट्री फक्त कार्यक्रमासाठीच मर्यादित होती.


शोला हीट करण्यासाठी हा लव्ह अँगल तयार करण्यात आला होता. आदित्य नारायणच्या आधीही हिमांश कोहली हे नाव नेहासोबत  (Neha Kakkar) जोडलं गेलं होतं. (neha kakkar will marriage to punjabi singer rohanpreet singh Bollywood news) नेहा आणि हिमांश अनेक दिवस एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला. प्रेमात धोका मिळाल्यानंतर दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात लिहित असल्याचंही चाहत्यांनी पाहिलं आहे. पण या सगळ्या चर्चेनंतर अखेर नेहाने लग्नाचा फायनल निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रसिद्ध गायक रोहनप्रीत सिंगच्या हवाल्याने रोहनप्रीत सिंग (Rohanpreet Singh) आणि नेहा लग्न करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.  (neha kakkar will marriage to punjabi singer rohanpreet singh Bollywood news) या महिन्याच्या शेवटच्या तारखेला त्यांचा विवाह होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांमध्येही लग्नाविषयी फायनल चर्चा झाली असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

कोण आहे रोहनप्रीत सिंग?

रोहनप्रीत सिंग ‘रायझिंग स्टार’ या गायन रियलिटी शोमध्ये पहिला रनरअप होता. तो बिग बॉस फेम शहनाज गिल या टीव्ही रिअ‍ॅलिटी शो ‘मुझसे शादी करोगे’ मध्येही चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. रोहनच्या आवाजाने त्याने अनेकांच्या मनात जागा मिळवली आहे. खरंतर, शहनाजसुद्धा रोहनला आवडत होती पण रोहनने नेहासोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हे दोघेही इंस्टाग्रामवर प्रेमाची कबूली देत अनेक पोस्ट शेअर करत आहेत.



आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!