नवऱ्याने बायकोला घेतले मिठी पहा व्हिडीओ झाले असं काही वाचा सविस्तर
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील पती-पत्नी एकमेकांना मिठीमध्ये घेत असताना त्यांनी पाळलेला कुत्रा मात्र चांगलाच नाराज झाला आहे. मलाही मिठीत घ्या म्हणत हा कुत्रा व्हिडीओतील नवरा-बायकोंना त्रास देतोय.
कुत्रा म्हणतो मलाही जवळ घ्या
व्हिडीओमध्ये नवरा-बायको एकमेकांना मिठीत घेत आहेत. यावेळी त्यांनी पाळलेला टकर नावाचा कुत्रा त्यांच्या मध्ये-मध्ये करतो आहे. जेव्हा नवरा-बायको एकमेकांच्या मिठीत येतात, त्याच वेळी हा कुत्रा दोघांवरही भुंकतो आहे. तो जोरात भुंकत असून मलासुद्धा जवळ घ्या असे सांगतो आहे.
हात समोर करताच कुत्रा दोघांकडे धावला
व्हिडीओतील जोडी एकमेकांना मिठीत घेताना हा कुत्रा त्यांच्या मध्ये-मध्ये करतोय. शेवटी व्हिडीओतील महिला जेव्हा कुत्र्याशी बोलणे सुरु करते, तेव्हा तो थोडा शांत होताना दिसतोय. व्हिडीओतील महिलेने तुलासुद्धा जवळ घ्यायचं का ? असे विचारले आहे. तसेच महिलेने समोर हात केल्यानंतर हा कुत्रा दोघांकडेही धावला आहे. महिलेने इशारा करताच कुत्र्याने त्यांच्याकडे झेप घेतली आहे
टिप्पणी पोस्ट करा