जगातील सर्वात महागडे मसाले कोणते आहेत पहा?

 


 


1) केशर- जगातील सर्वात महाग मसाला आहे ज्यासाठी 1 किलो मागे 7 ते 70 लाख रुपये मोजावे लागतात.


2) व्हॅनिला - तसे तर आपल्याला फक्त व्हॅनिला आईसक्रीमच माहीत आहे पण जगामध्ये भरपूर ठिकाणी व्हॅनिला अर्कचा मसाला म्हणून पण उपयोग करतात ज्यासाठी एक किलो मागे 40 ते 50 हजार रुपये खर्च करावे लागतात.


3) महलाब किंवा महालेपी - हा मसाला एका चेरीच्या बीयांपासून बनतो आणि या मसाल्यासाठी आपल्याला 9 ते 10 हजार रुपये द्यावे लागतात.

4) लॉन्ग पाइपर (पिंपळी)- हा चवीला काळी मिरी सारखाच मसाला आहे पण हा काळी मिरी पेक्षा जास्त तिखट असतो, हा मसाला भारत, नेपाळ, मलेशिया या देशात सापडतो ज्याची किंमत 6 ते 7 हजार रुपये प्रति किलो इतकी असते.



5) काळे जिरे - हे जिरे रोजच्या वापरातल्या जिऱ्यापेक्षा पातळ, छोटे, आणि काळ्या रंगाचे असतात आणि याची चव ही खुप तीव्र असते हे काळे जिरे 5 ते 6 हजार रुपये प्रति किलो भेटतात.



6) काफिर लिंबाची पाने (नक्की मराठी नाव माहीत नाही) - याची सुखलेली पाने 4 ते 5 हजार रुपये प्रति किलो भेटतात.


7) ग्रेनस ऑफ पॅराडायज - हा मसाला घाना, लिब्रिया, टोगो या सारख्या देशात भेटतो याची प्रति किलो किंमत 4 ते 4.5 हजार रुपये एवढी आहे


8) विलायची - आपल्या इथे चहा आणि वेगवेगळ्या मिठाई मध्ये वापरली जाणारी विलायची ची किमत 2 ते 2.5 हजार रुपये प्रति किलो एवढी असू शकते.



9) लवंग - भारतीय पदार्थांमध्ये तसेच एक औषधी मसाला म्हणून याचा उपयोग केला जातो आणि याची किंमत एक किलो साठी 500 ते 1000 रुपये असू शकते.


10) दालचिनी - हा सुवासिक आणि प्रत्येकच्या घरी आवर्जून आढळणारा मसाला जो 400–500 रुपये प्रति किलो या दराने भेटतो. 

हे आहेत जगातील काही महागडे मसाले!


आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!