'या' पदार्थांच्या सेवनाने शरीराला व्हिटामिन-डीची कमतरता भासणार नाही

'या' पदार्थांच्या सेवनाने शरीराला व्हिटामिन-डीची कमतरता भासणार नाही


'व्हिटामिन-डी'ची कमतरता असणाऱ्या लोकांना कोरोना काळात अधिक धोका असतो. 

व्हिटामिन-डी'मुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे आपले शरीर कोणत्याही प्रकारच्या विषाणूंविरूद्ध लढण्यास तयार होते.

म्हणून आहारात व्हिटामिन डीची कमतरता भरून काढणाऱ्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.चला तर मग या पदार्थांविषयी जाणून घेऊ...


या पदार्थांचा आहारात करा समावेश

● मांस आणि भाजीपाला

मांसामध्ये व्हिटामिन-डी जास्त प्रमाणात आढळते. परंतु, आपण शाकाहारी असल्यास मशरूम आणि रताळे खाऊ शकता. यामुळे आपल्या शरीरात व्हिटामिन-डीची कमतरता भरून निघेल.

● संत्र्याचा रस

ताज्या संत्र्याचा अथवा फोर्टिफाइड संत्र्याचा रस व्हिटामिन डीची कमतरता भरून काढू शकतो. संत्र्याच्या रसामुळे शरीराला 12 ते 15 टक्के व्हिटामिन-डी मिळते.

● अंड्यातील पिवळ बलक

अंडी आपल्या शरीराला व्हिटामिन-डी पुरवू शकतात. अंड्याच्या आतील पिवळा बलक अतिशय पौष्टिक आणि प्रथिनेयुक्त असतो. यातून शरीराला व्हिटामिन-डी मिळतो.

● गायीचे दूध

गायीचे दूध व्हिटामिन-डीने समृद्ध असते. जे आपल्या शरीराला जवळपास 20 टक्के व्हिटामिन-डी देते.

● दही

दही खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन-डी देखील मिळते. म्हणूनच आहारात याचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून आपल्या शरीराला व्हिटामिन-डीची कमतरता भासणार नाही.