सौदी अरेबियात भारतीय फ्लाइट्सवर बंदी - Indian flights banned in Saudi Arabia



 सौदी अरेबियात भारतीय फ्लाइट्सवर बंदी


⚡ सौदी अरेबियाने भारतातील वाढत्या कोरोनाची संख्या पाहता देशातून येणाऱ्या-जाणाऱ्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. 

💁‍♂️ बंदी : सौदी अरेबियाच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने एक परिपत्रक जारी करत सांगितले की भारत, ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये देशातून जाणाऱ्या-येणाऱ्या सर्व फ्लाइट्सवर बंदी घातली आहे.

📄 परिपत्रक : 'कोरोना व्हायरसचा उद्रेक झालेल्या देशांशी यात्रेवर बंदी' शीर्षकाखालील परिपत्रक नागरी उड्डाण प्राधिकरणाने सौदी अरेबियाचे सर्व विमानतळावर, एअरलाईन आणि चार्टेड फ्लाइट कंपन्यांना पाठवले आहे.

🧐 सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय प्रवासी राहतात. 

✈️ स्पेशल फ्लाइट : भारतात कोरोनामुळे 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणावर बंदी आहे. मात्र वंदे भारत मिशन अंतर्गत भारत-सौदी अरेबियामध्ये स्पेशल फ्लाइट सुरू आहेत.


Indian flights banned in Saudi Arabia


 Saudi Arabia has banned inbound and outbound flights due to the growing number of corona in India.

Ban: Saudi Arabia's civil aviation authority has issued a circular banning all flights to and from India, Brazil and Argentina.

Circular: The Civil Aviation Authority (CAA) has sent a circular to all Saudi Arabian airports, airlines and chartered flights under the heading 'Travel to countries with corona virus outbreaks'.
Saudi Arabia and the United Arab Emirates are home to a large number of Indian migrants.

 Special flight: International flights have been banned in India since March 23 due to corona. However, under the Vande Bharat Mission, special flights are running between India and Saudi Arabia.