महिला अधिकाऱ्याकडून टॉयलेटमधला फोटो शेअर, नेटकऱ्यांकडून तिची पाठाराखण, ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर
TV9
सोशल मीडियावर दररोज विविध कारणांवरून वाद-प्रतिवाद सुरु असतात. सध्यादेखील सोशल मीडियावर एका महिलेल्या फोटोवरुन मोठा वाद रंगला आहे. या महिलेने बाथरूममध्ये (Bathroompic) कमोडवर बसलेला आपला फोटो शेअर केला होता. त्यानंतर फेसबुकसह सोशल मीडियावर संस्कृतीरक्षक विरुद्ध उदारमतवादी असा वाद रंगला आहे. (women sitting on commode going viral on social media)
भारतीय माहिती आणि प्रसारण खात्यात कार्यरत असणाऱ्या गीता यथार्थ यांचा हा फोटो आहे. त्यांनी आपला टॉयलेट कमोडवर बसलेला फोटो फेसबुकवर शेअर केला होता. सिंगल पॅरेंट असल्यामुळे गीता यांना आपल्या लहान मुलाची सतत काळजी घ्यावी लागते. त्यामुळे गीता यांना अगदी बाथरुमला जातानाही मुलाला एकटे सोडता येत नाही. त्यामुळेच आपण बाथरुमला जाताना दरवाजा बंद करत नाही, असे गीता यथार्थ यांनी सोशल मीडियावर सांगितले होते.
सोशल मीडियावर ट्रोल
गीता यथार्थ यांच्या या फेसबुक पोस्टवर कमेंटसचा पाऊस पडत आहेत. काहीजण त्यांना खालच्या भाषेत ट्रोल करत आहेत. हा फोटो म्हणजे अश्लिलता असल्याचे या संस्कृती रक्षकांचे म्हणणे आहे. हे तर काय सगळेच करतात, पुरुषांनाही मूल सांभाळताना हे करावंच लागतं, यात असा सनसनाटी फोटो टाकण्याची काय गरज आहे, असा सवाल काही ट्रोलर्सनी त्यांना विचारला. तर काही लोकांनी यापेक्षाही खाली जात तुम्ही तुमच्या खासगी क्षणांचेही फोटो शेअर करा, अशी विकृत मागणी केली आहे.
गीता यथार्थ यांच्या मोहिमेला प्रतिसाद
गीता यथार्थ यांनी हा फोटो फेसबुकवर शेअर केल्यानंतर अनेक महिलांनी आपले फोटो शेअर करण्यास सुरुवात केली. #Bathroompic या हॅशटॅगचा वापर करून महिला त्यांचे फोटो शेअर करत आहेत.
‘फक्त एक दिवस लहान मुलांना सांभाळून दाखवा’
आपल्याकडे काहीजण अगदी स्तनपान करणाऱ्या महिलांकडेही वाईट नजरेने पाहतात. अशांना या फोटोमागील उद्देश काय कळणार? या फोटोमध्ये कोणतीही अश्लिलता नाही. फक्त एक दिवस पूर्णवेळ लहान मुलाला सांभाळून दाखवा. जेणेकरून एका आईला काय करावे लागते, हे तुम्हाला समजेल, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली.
टिप्पणी पोस्ट करा