डोंबिवलीत - पोलीस कर्मचारीच्या अंगावर सोडला कुत्रा

 

पोलीस आणि महापालिकेच्या कारवाई पथकाकडून संयुक्तरित्या कारवाई सुरु

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस आणि महापालिकेच्या कारवाई पथकाकडून संयुक्तरित्या विनाकारण फिरणारे आणि मास्क न घालता फिरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु आहे. मात्र, डोंबिवली पूर्व भागातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या मदतीने कारवाई पथक कारवाईसाठी फिरत असताना विचित्र प्रकार घडला.

आरोपींनी पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले

परिसरात एका ठिकाणी गणेश ऑटोमोबाईल नावाचे गॅरेज सुरु होते. या गॅरेजसमोर तीन जण बसले होते. त्यांनी मास्क घातला नव्हता. या दुकानात दोन पाळीव कुत्रे होते. पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या तिघांना मास्क न घातल्याने पाचशे रुपये दंड भरण्यास सांगितले. या तिघांनी कारवाईस विरोध केला. आरडाओरडा सुरु केला. पथकाच्या काही कर्मचाऱ्यांना ज्यामध्ये पोलिस होते त्यांना धक्काबुक्की केली. कुत्र्याला छू म्हटल्याने त्या कुत्र्याने अनिल तायडे या पोलीस कर्मचाऱ्याचा चावा घेतला.