💓 मला खरं तर प्रेम काय असतं हे माहितच नव्हतं | I didn't really know what love was
दिवसभरात काय केलं ? आता काय करत आहेस ? सकाळी उठल्यावर gm चा sms, रात्री gn चा sms असा प्रत्येक क्षणाक्षणाचा हिशोब दिलाच पाहिजे. रोज सकाळी उठल्यावर gm चा sms नाही आला की असं वाटत दिवस सुरु झालाचं नाही आणि रात्री जोपर्यंत gn चा sms येत नाही तोपर्यंत झोपच लागत नाही.
कधी कोण कसं आयुष्यात येत हे कळतचं नाही. जसा तु माझ्या आयुष्यात आलास. असं कधी वाटलचं नव्हतं कि मला तुझ्यावर एवढं प्रेम होईल. माझ्या स्वप्नातला राजकुमार हा तूच असशील. असं बोलतात ना की जोडया वरूनच बनून येतात. तसेच देवाने फक्त माझ्यासाठीच तुला पाठवलं आहे असं वाटत. मला कधी वाटलचं नाही माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा मुलगा माझ्या आयुष्यात येईल. मला खरं तर प्रेम काय असतं हे माहितच नव्हतं. हे मला तुझ्यामुळेच कळलं आणि माझं हे प्रेम तुझ्यावर असचं प्रत्येक जन्मी राहील.❤
- वैशाली ठाकूर


टिप्पणी पोस्ट करा