मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त.....

 


बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, असं अभिनेत्री कंगना रनौत (Actress Kangana Ranaut) ट्विटरवर म्हणाली आहे. भाजप प्रवक्ते राम कदम यांच्या ट्विटला प्रतिक्रिया देताना कंगना रनौतने मुंबई पोलिसांबाबत वक्तव्य केलं.


राम कदम यांनी कंगना रनौतला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र पाठवले आहे. त्यानंतर त्यांनी ट्विटरवरही याबाबत मागणी केली. “अभिनेत्री कंगना रनौत बॉलिवूड आणि ड्रग्ज माफियांविषयी माहिती देण्यास तयार आहे. मात्र. यासाठी तिला सुरक्षा देणं जरुरीचं आहे. दुर्देवं म्हणजे महाराष्ट्र सरकारने अजूनही तिला सुरक्षा दिलेली नाही”, असं राम कदम ट्विटरवर म्हणाले.

(Actress Kangana Ranaut)

राम कदम यांच्या या ट्विटला कंगनाने उत्तर दिलं. “माझ्या काळजीसाठी धन्यवाद, बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी”, असं कंगना रनौत (Kangana Ranaut) म्हणाली. (Kangana Ranaut)

कंगनाच्या प्रतिक्रियेनंतर राम कदम यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत महाराष्ट्र सरकारवर टीका केली. “अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हस्तक्षेप करुन महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांच्या सक्षम प्रतिमेला मलीन केलं आहे. काही मोठ्या लोकांना वाचवण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे, असं आता जगासमोर आलं आहे. महाराष्ट्र सरकार कंगनाशी (Actress Kangana Ranaut) चर्चा करुन तिचा विश्वास पुन्हा संपादित करु शकेल? हा प्रश्न आहे”, अशी टीका राम कदम यांनी केली.(Actress Kangana Ranaut)