❤️ काश मलाही जमलं असतं तर... I wish I had gathered too ...


"बस ही शेवटची कविता तुझ्यासाठी"
"काही माझ्या मनातलं"

पोहचल्या माझ्या भावना तर Reply कर..
असं काहीसं लिहीलं होतं मी त्या Mail मध्ये
पण तरीही Reply आलाचं नाही..

एक मन म्हणाले, बस आता लिहायचेचं नाही,
शब्दांशाही बोलायचे नाही..
तुझ्यासाठी लिहिणाऱ्या..
माझ्या त्या शब्दांवरही चिडले थोडा वेळ..

पण दुसरे मन म्हणाले,
" तू नाही " पण, तू दिलेल्या आठवणींना शब्दात तर जपता येईल"
तूच तर दिल्यात आता भावना लिहायला,
हा.. कधी पापण्यातही भरून येतात त्या,
कधी डोळ्यातून वाहतात अगदी आटेपर्यंत,
अजून काय बोलू वेदना सांगायला आता शब्दच उरले नाही..

आलास online पण, बोलला काहीचं नाहीस,
दिसल्या माझ्याच कवितेच्या शेवटच्या चार ओळी satus वर
पण ते ही मनाला सावरून गेलं,
शब्द तर ठेवलेस माझे मनात जपून,
याचं समाधान वाटलं
पण, कसं रे जमत कोणाला,
ज्यावर प्रेम आहे त्याच्याशी अबोला धरायला?
काश मलाही जमलं असतं तर....
गरज नसती पडली शब्दांची अबोला सहन करायला....