अश्लील चित्रपटप्रकरणी अटकेत असलेला राज कुंद्रा दोषी आढळला तर काय शिक्षा होणार?



● फेब्रुवारी २०२१ मध्ये अश्लील चित्रपट बनवून काही अ‍ॅप्स आणि ओटीटी फ्लॅटफॉर्मवर दाखविल्याबद्दल बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री गुन्हे शाखेने अटक केली. या प्रकरणात राज कुंद्रा हे मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे मिळाल्याप्रकरणी शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली, आमच्याकडे यासंदर्भात पुरेसे पुरावे आहेत, असेही गुन्हे शाखेनं सांगितलंय.

● काही दिवसांपूर्वी वेब सीरिजच्या नावाखाली अश्लील चित्रपट बनवण्याचे रॅकेट मुंबई आणि गुजरातमधून देश-विदेशात पसरत असल्याचे उघडकीस आले होते. यामध्ये गहना वशिष्ठ यांचे नाव आले होते. तर तन्वीर हाश्मी नावाच्या ४० वर्षीय व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने  सुरत येथून अटक केली होती. या प्रकरणात उमेश कामत राज कुंद्राच्या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक असल्याने यांनाही अटक करण्यात आली होती.

● यामध्ये एकूण पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश होता. या प्रकरणात राज कुंद्रा दोषी आढळला तर तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.

● या प्रकरणात दोषी आढळल्यास सुधारित माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ मधील कलम ६७ (अ) आणि भादंवि कलम २९२, २९३, २९४, ५००, ५०६ आणि ५०९ यानुसार शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. या प्रकरणी पहिल्यांदाच दोषी आढळलेल्या आरोपीला ५ वर्षांचा तुरुंगवास किंवा १० लाखांचा दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. दुसऱ्यांदा असा गुन्हा केल्यास ७ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.