पुन्हा कंगना राणावतला कोरोनाची लागण सविस्तर



अभिनेत्री बॉलिवूड क्विन कंगना राणावत हिला कोरोनाची लागण झाली आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट करत तिने आपल्या चाहात्यांना याविषयी माहिती दिली. सध्या ती घरीच क्वारंटाईन असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे.

तिने एक फोटो शेअर केले आहे, ज्यामध्ये ती ध्यानधारणा करताना दिसत आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मागील काही दिवसांपासून मला खूप थकवा आला होता आणि माझे डोळे देखील जळजळत होते. हिमाचलला जाण्यापूर्वी मी काल माझी कोरोना टेस्ट करून घेतली होती आणि आज त्याचा निकाल आला आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. हे काळातच मी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. हा विषाणू माझ्या शरीरात आहे, हे मला काहीच माहिती नव्हते. आता मला माहित आहे की, मी यातून लवकरच पूर्णपणे बरी होईन.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारावर कंगनाने वादग्रस्त ट्विट केले होते. यानंतर ट्विटर ने तिचे ट्विटर अकाउंट बंद केले होते. भाजपला पाठिंबा देत कंगना उघडपणे टीएमसीवर निशाणा साधत होती. गँगरेपचा आरोप करत कंगनाने टीएमसीविरोधात ट्वीट केले होते, त्यानंतर ट्विटरने तिचे खाते निलंबित केले गेले होते. कंगनाचे ट्विटरkangana ranaut खाते आता कायमचे निलंबित करण्यात आले आहे.