बीडचा मुलगा धावतोय टोकियो ऑलम्पिकमध्ये!



वीटभट्टी कामगाराचा मुलगा धावतोय टोकियो ऑलम्पिकमध्ये!

जपानच्या टोकियो शहरात ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. १०० पेक्षा जास्त भारतीय खेळाडू या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झाले असून महाराष्ट्रातले ८ सदस्य यात सहभागी आहे. 

 यामध्ये बीडचा अविनाश साबळे ३ हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. बीडसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या अविनाशने उत्तम सराव करत ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे. 

काही दिवसांपूर्वी पटीयाला येथे झालेल्या National Athletics Championships मध्ये 8:20:20 अशी वेळ नोंदवत अविनाशने राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे.


कोण आहे अविनाश साबळे ?

२६ वर्षीय अविनाश साबळे हा बीड जिल्ह्यातील मांडवा गावचा तरुण आहे. अविनाश साबळेचं कुटुंब हे शेतकरी आहे, शेतीवर त्यांचं घर चालतं. लहानपणी घर ते शाळा हे ६ किलोमिटरचं अंतर अविनाश अनेकदा धावत जाऊन किंवा चालत जाऊन पूर्ण करायचा.

त्याच्या याच शरिरयष्टीमुळे त्याला सैन्यदलाकडून खेळण्याची संधी मिळाली. १२ वी पर्यंत शिक्षण पार पडल्यानंतर अविशान भारतीय सैन्यदलाच्या ५ व्या महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला. आतापर्यंत अविनाशने सियाचीन, राजस्थान, सिक्कीम यासारख्या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावलं आहे.

२०१९ साली दोहा येथे झालेल्या World Championship मध्ये अविनाशने आपलं वैयक्तिक राष्ट्रीय रेकॉर्ड दोन वेळा मोडून ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं. पटीयाला येथे झालेल्या National Athletics Championships मध्ये सर्वोत्तम वेळ नोंदवत अविनाशने आपली मेहनत पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. 

सध्या जागतिक क्रमवारीत १६ व्या क्रमांकावर असलेल्या अविनाशला टोकियोमध्ये कडवी झुंज मिळणार आहे. परंतू महाराष्ट्राचा हा वाघ जपानमध्ये आपली जादू करुन दाखवेल अशी सर्वांना आशा आहे.