उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील परिस्थितीची शून्य जाण
Ilovebeed Breaking News - उद्धव ठाकरे Uddhav Thackeray हे महाराष्ट्राला आजवर लाभलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री असल्याची टीका भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांचा राज्याच्या परिस्थितीबद्दलचा अभ्यास शून्य आहे. ते अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करुन काय साधणार आहेत, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे सोमवारी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी रविवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे हे राज्यातले सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री आहेत. कोरोनामुळे एवढ्या लोकांचा बळी जात असताना आणि राज्यात पुराचा कहर सुरु असताना मुख्यमंत्री घरात बसून होते. आता ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, आता वेळ उलटून गेली आहे. मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या परिस्थितीबद्दलचा अभ्यास शून्य आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
याच कारणामुळे उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी सोलापूरचा दौरा घोषित केल्याची शक्यता आहे. ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा एक दिवसाचा दौरा असणार आहे. ते विमानाने सोलापूरला जातील आणि तिथून पुढे गाडीने सांगवी आणि अक्कलकोटला जाणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा