वॉशरूमच्या बाहेर जमली गर्दी, त्यानंतर तिने जे काय केलं ते पहा..

 उर्फी जावेद ही तिच्या बोल्ड फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. ‘बिग बॉस ओटीटी’मधून ती प्रकाशझोतात आली होती, पण त्या शोमधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक ठरली. त्यानंतर कमालीच्या बोल्ड फॅशन ड्रेसिंगमुळे तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतले. उर्फीचे फोटो क्लिक करण्यासाठी काही लोक थेट लेडीज वॉशरूमपर्यंत तिचा पाठलाग करत गेले. उर्फी सुद्धा त्यांच्याशी गप्पा मारतच होती. त्यानंतर तिने जी कृती केली त्याची चांगलीच चर्चा झाली.



जेव्हा जेव्हा उर्फी जावेदला स्पॉट केले जाते तेव्हा ती विचित्र प्रकारच्या कपड्यामध्येच दिसते. या व्हिडिओत उर्फीचा लूक पाहून तुमचंही डोकं नक्कीच चक्रावेल. उर्फी तिची अंतरवस्त्र दिसतील असा प्रकारे वरून ट्राउझर आणि टी-शर्टमध्ये घालून सार्वजनिक ठिकाणी सिनेमा बघण्यासाठी आली होती. उर्फीच्या या कृत्यांमुळे सोशल मीडियावर अनेक लोकांनी तिच्यावर टीका केली तर काहींनी तिचा अतिबिनधास्तपणा लाईकही केला.


उर्फीने कॅज्युअल लुक्सवर प्रयोग करत फारच बोल्ड फॅशनचे कपडे घातले होते. इतकेच नव्हे तर तिने हेवी मेकअपही केला होता. एकीकडे उर्फी कधी दुसर्‍याचे पॉपकॉर्न ऑफर करताना दिसली तर कधी दुसऱ्या मुलासोबत पॉपकॉर्न खाताना दिसली. याच व्हिडिओमध्ये उर्फी महिलांच्या वॉशरूमच्या बाहेरही दिसली. मात्र, वॉशरुमजवळ काही लोक तिचे फोटोज क्लिक करण्यासाठी येत असल्याचे पाहून उर्फीने इतर मुलींना आतच थांबायला सांगितले आणि त्यानंतर अतिउत्साही लोकांना पुढे येण्यापासून रोखत स्वत: पुन्हा बाहेर आली.