वडवणी मध्ये ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू वाचा सविस्तर



ग्रामसेवकच्या कारचा व ट्रॅव्हल्सचा सामोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी पहाटेच्या सुमारास बीड परळी महामार्गावर नेहरकर हॉटेल जवळ झाला.

देवडी येथील ग्रामसेवक राजेंद्र मुंडे हे बीड येथे स्विफ्ट गाडी (MH 02 CP 5226) कामानिमित्त पहाटे निघाले होते. याच दरम्यान पुण्यावरून परळीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची (MH 29 V 7227) समोरासमोर धडक झाली. या अपघातात राजेंद्र मुंडे यांचा जागीच मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी वडवणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कारचा चुराडा झाला आहे.